पूर्ववैमनस्यातून कल्याण येथे तलवारीने हल्ला
पूर्ववैमनस्यातून कल्याण येथे तलवारीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून सिद्धेश आयरे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सिद्धेश आयरे याच्यावर यश सोनवणे, चैतन्य पगारे आणि बाबू या त्रिकुटाने शुक्रवारी रात्री शिवाजी मिनी परिसरात तलवारीने हल्ला केला. यश ने त्याच्या हातातील तलवारीने सिद्धेश चा गळ्यावर वार केला तो वाचण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिद्धेशच्या हाताला गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर हे त्रिकुट शिंदेच्या घरी गेले त्याची आई घरात एकटी असल्याचे पाहून त्यांनी दरवाजावर लाथ मारत पोलिसात तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी दिली सिद्धेश कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली आहे. पोलिसांनी यश चेतन्य आणि बाबू विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: