पूर्णवेळ प्रचारक म्हणून डोंबीवलीतुन सुरुवात केलेले भय्याजी जोशी पुन्हा संघाच्या सरकार्यवाह पदी
संघाच्या सरकार्यवाह पदी पुन्हा भय्याजी जोशी
सुरेश तथा भय्याजी जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाह पदी पुन्हा एकदा सर्वानुमते निवडले गेले असून यापदी ते सतत चौथ्यांदा निवडले गेले आहेत.मुळचे इन्दोरचे असणारे भय्याजी जोशी बालपणापासून संघाचे स्वयंसेवक होते.डोंबीवलीत असतानाच त्यांनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून सुरुवात केली होती. त्यांचे सहकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख श्रीपाद जोशी यांच्याशी मुंबई आसपासने संवाद साधला व त्यांच्या कार्यकुशल कार्यपद्धतीबद्दल जाणून घेतले.
पूर्णवेळ प्रचारक म्हणून डोंबीवलीतुन सुरुवात
त्यांचे बंधू नोकरी निमित्त डोंबीवलीत आल्याने भय्याजी जोशी डोंबीवलीत आले.१९७० ते१९७५ दरम्यान शिक्षण म्हणजेच ग्रॅजुएशन पूर्ण केले व काही काळ नोकरी केली परंतु नंतर नोकरी सोडून संपूर्ण वेळ संघासाठी वाहून घेतले.सुरवातीला ठाणे जिल्ह्याचे प्रचारक म्हणून त्यांनी काम पाहिले.यावेळी संघाने सेवाकार्याची नुकतीच सुरुवात केली होती.ठाणे जिल्ह्यात तलासरी,वाडा,कल्याण अशा अनेक ठिकाणी आज चालणारी सेवाकार्ये योग्य प्रकारे चालण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यात वनवासी आश्रमासाराखे उपक्रमही आहेत.
नाशिक येथे विभाग प्रचारक
यानंतर त्यांनी नाशिकला विभाग प्रचारक म्हणून कार्य केले . १९८२ ते १९८९ दरम्यान त्यांनी नाशिकला विभाग प्रचारक म्हणून कार्य करत येथेही आपल्या कार्यपद्धतीने अनेक कार्यांना योग्य प्रकारे राबवले.
भूकंपग्रस्तांसाठी कार्य
लातूर
१९९३ साली लातूर येथील भूकंपाच्या वेळी ते संघाचे प्रांत सेवाकार्य प्रमुख होते.येथे भूकंपात उद्ध्वस्त झालेली रवेट,चिंचोळी ही गावे दत्तक घेवुन ती गावे पुन्हा वसवण्यात आली होती.
भुज
भुज येथे २००० साली झालेल्या भूकंपात भुज मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले होते.यात राष्ट्रीय सेवा कार्य प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले.तेथेही त्यांनी भरीव कार्य केले.
त्यांचा उत्साह आणि आपुलकी तरुणांसाठी प्रेरणादायक
आज त्यांचे वय ७१ वर्ष असून आजही त्यांचा उत्साह तरुणांना प्रेरणा देणारा असा आहे. त्यांच्या संपर्कात येणा-या प्रत्येक कार्यकर्त्याला ते नावानिशी ओळखत असल्याने तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्याशी आपुलकीने वागण्याची त्यांची सवय यामुळे ते युवा कार्यकर्त्यात फारच प्रसिद्ध आहेत असही त्यांचे सहकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख श्रीपाद जोशी यांनी मुंबई आसपासशी बोलताना सांगितले.