पूना लिंक रोडच्या अर्धवट कामाबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी दिला उपोषणाचा इशारा !

कल्याण – गेल्या सहा वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या पूना लिंक रोडच्या अर्धवट कामाला त्वरीत सुरुवात न केल्यास येत्या १० तारखेपासुन पालिका मुख्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा पालिका आयुक्त पी . वेलरासु यांना आमदार श्री . गणपत गायकवाड यांनी दिला आहे . या मुळे संबंधीत पालिका अधिकारी आणि ठेकेदार यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे .

सुचक नाका ते श्रीराम टॉकीज या दरम्यानच्या पूना लिंक रोडवरील आजही सुमारे ४० टक्के
काँक्रींटीकरणाचे काम बाकी आहे . पुर्ण झालेले काम निष्कृष्ट दर्जाचे झाले असून बहुतांशी पदपथांवरील लाद्या उखडून गेल्या आहेत . तर अनेक ठिकाणी रोड दुभाजकाची दुरावस्था झाली आहे . अशातच या रोडच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या वीस ते पंचवीस इमारती तोडणे बाकी आहे . त्या मुळे संबंधीत ठिकाणी रोडच्या मुळ प्रकल्पाच्या आराखड्याप्रमाणे सध्य स्थितीत रस्ता निर्माण करणे शक्य नाही . तसेच बऱ्याच ठिकाणी काँकीटीकरणासाठी रस्त्याच्या खाली विविध प्रकारच्या सेवा वाहिन्यांचे जाळे असल्याने त्या ठिकाणी काँकीटीकरण करता येत नसल्याचे संबंधीत आधिकारी आणि ठेकेदार सांगत आहेत . परंतु असे असले तरीही अनेक ठिकाणच्या खड्डेमय परिस्थितीमुळे वाहन चालक आणि नागरीक हैरान झाले असून मोठ्या प्रमाणावर वाहन अपघात आणि वाहतुक कोंडीमध्ये वाढ झाली आहे . या समस्यांबाबत
नागरीकांचे हित लक्षात घेऊन रखडलेले काम त्वरीत मार्गी लावण्यात यावे अन्यथा येत्या दहा तारखेपासुन आपण आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका आयुक्त वेलरासू यांना दिला आहे .
या इशाऱ्यानंतर तरी पालिका प्रशासनाला जाग येऊन पुना लिंक रोडचे उर्वरीत काम मार्गी लागेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरीकांडुन व्यक्त होत आहे .

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email