पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन सुरु,पहिल्याच दिवशी 26 हजार पुस्तक जमा
(श्रीराम कांदु)
डोंबिवली- फेण्ड्स लायब्ररी, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, रोट्रॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन युथ व डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ झाला. भारतात प्रथमच पै फेण्डस लायब्ररीने पुस्तक आदान प्रदान ही संकल्पना डोंबिवलीत राबविली आहे. या उपक्रमाला मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20 टक्क्यांनी अधिक प्रतिसाद मिळाला आहे.
टिळकनगर शाळेच्या पटांगणात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 15 एप्रिलर्पयत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले आहे. जगाच्या पाठीवर जर्मन, फ्र ान्स, इटली व इंग्लंड अश्या काही मोजक्याच देशात पुस्तके आदान प्रदान प्रदर्शने भरविली जातात. या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. या प्रदर्शनात वेगवेगळ्य़ा विषयांवरील पुस्तकांचा संग्रह जमा होतो. वाचकांनी आपल्याकडील पुस्तके या प्रदर्शनात दयायची आणि प्रदर्शनातील पुस्तके घेऊन जायची असा हा उपक्रम आहे. डोंबिवलीत आयोजित आदान प्रदान पुस्तक प्रदर्शनाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. या प्रदर्शनांसाठी मराठी व इंग्रजी भाषेतील, वाचकांनी वाचलेली व सुस्थितीत असलेली आणि मूळ प्रत असलेली पुस्तके देता येणार आहेत. ही पुस्तके 15 एप्रिलर्पयत स्वीकारली जाणार आहेत. कथा, कादंबरी, चरित्र, नाटक, आध्यात्मिक अशी इंग्रजी व मराठी भाषिक पुस्तके वाचकांनी दिली आहेत. त्यामध्ये मारूती चित्तमपल्ली, पु.ल. देशपांडे, व. पु. काळे अश्या नामकिंत लेखकांची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. आतापर्यत प्रदर्शनात 26 हजार पुस्तके आली आहेत. त्यातील आज प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 22 हजार पुस्तके प्रदर्शनात मांडली आहेत. दररोज 4 ते 5 हजार पुस्तके येतील अशी अपेक्षा आयोजक पुडंलिक पै यांनी व्यक्त केली आहे.
8 ते 15 एप्रिल या कालवधीत सकाळी 9.30 ते 12.30 या वेळेत पेंढरकर सभागृह, टिळकनगर शाळेत बालसंस्कार वर्गाचे आयोजन केले आहे. या शिबीराला विद्याथ्र्याकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे.