पुण्यात उद्या बेमुदत चक्री उपोषण
पुणे दि.१९ – मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई, त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी; तसेच आंदोलकांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशा विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (20 ऑगस्ट) पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य समन्वयक शांताराम कुंजीर, तुषार काकडे, बाळासाहेब आमराळे, रेखा कोंडे आणि सचिन आडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
हेही वाचा :- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार प्रतिकार करणाऱ्या पीडितेला केली मारहाण – डोंबिवलीतील घटना
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरासह पुण्यात देखील ठिय्या आंदोलन करण्यात आले.या दरम्यान आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे गुन्हे पोलीसांनी मागे घ्यावेत. तसेच आरक्षण केव्हा देणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी द्यावे.या मागणीसाठी राज्यभरातील विविध ठिकाणी २० ऑगस्टपासून चक्री उपोषण करण्यात येणार असून पुणे विभागीय कार्यालया समोर देखील करण्यात येणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या समन्वयक समितीच्या शांताराम कुंजीर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा केली.
हेहोई वाचा :- खंडणीसाठी चक्क एका म्हशीचे अपहरण
चक्री उपोषण आंदोलनात सहभागी होणार्यांसाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. आंदोलन शांततेने, संयमाने व शिस्तीने करावे, गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये, प्रक्षोभक व भडकावू घोषणा-भाषणे करू नये, आंदोलनादरम्यान झालेला कचरा, रिकाम्या बाटल्या कचरा पेटीत टाकाव्यात, अनुचित प्रकार करणार्यांना रोखून पोलिसांच्या ताब्यात द्या, अशी वर्तणूक ठेवून कार्यकर्त्यांनी बेमुदत चक्री उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन मोर्चाच्या समन्वयकांनी केले. मोर्चाच्या राज्य समन्वय समितीची औरंगाबादेत लवकरच बैठक होणार असून त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरेल, असेही सांगण्यात आले.