पुढल्या 12 तासात ‘गज’ चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता
‘गज’ चक्रीवादळ पश्चिम-मध्य, पूव-मध्य आणि दक्षिण बंगालच्या पश्चिमी दिशेकडे सरकत आहे. गेल्या सहा तासात त्याचा वेग 10 कि.मी. प्रती तास होता. आज सकाळी 11.30 ते दक्षिण-पूर्व, पश्चिम-मध्य आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात होतं. पुढल्या 12 तासात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम-दक्षिण, पश्चिम दिशेकडे सरकत असताना उद्या त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. उद्या संध्याकाळपर्यंत ते तामिळनाडूची किनारपट्टी ओलांडेल. वादळी वाऱ्यांचा वेग 80 ते 90 कि.मी. प्रती तास राहील, असा अंदाज आहे. 15 आणि 16 नोव्हेंबरला तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. 14 आणि 15 नोव्हेंबरला मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.
Please follow and like us: