पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी व अन्य कल्याण डोम्बिवली अपराध वृत्त

(श्रीराम कांदु )

कल्याण पश्चिमेतील चिखलेबाग येथील रत्नदीप इमारतीच्या गाळ्यात शनिवारी एकनाथ बाबुराव जाधव (६१) हे नेहमीप्रमाणे सोन्याचे दागिने तयार करण्याचे काम करीत होते .दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानात दोन अज्ञात व्यक्ती आल्या .त्यापैकी त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून व ठोश्याने डोक्यावर मारून ‘ चूप बैठ ,चील्लाने का नही ‘ असे धमकावले .दुकानातील टेबलाच्या ड्रावरमध्ये असलेले ४० हजार रुपये किमतीचे २० ग्रेम सोन्याचे दागिने आणि १ लाख ३० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरी चोरी करून मोटारसायकलवरून ते पसार झाले .याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

पैशांची बेग लंपास

उल्हासनगर मध्ये राहणारे शरद नानाभाऊ घाडगे (४५ ) हे शनिवारी कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील रॉयल स्टील सेंटरमध्ये साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते .त्यांनी आपली पैशांची बेग बाकड्यावर ठेवून ते साहित्य पाहत असताना त्यांची बेग तेथून लंपास झाली .त्या बेगेत १ लाख ५ हजार ७०० रुपयांची रोकड आणि बँक खात्याचे पासबुक ,चेकबुक आणि एटीएम होते .याप्रकरणी त्यांनी मदनलाल जयस्वाल नामक व्यक्तीवर संशय व्यक्त करीत कोळसेवाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे .

दोन मोटारसायकल चोरीला

 कल्याण डोंबिवलीत चोऱ्या ,घरफोड्या यांचे सत्र सुरूच असून शनिवारी दोन मोटारसायकल चोरीला गेल्याची नोंद झाली आहे .कल्याणच्या बेतूरकर पाडा मध्ये राहणारे राजू जगदीश बधेल (३० ) या भाजी विक्रेत्याने विठ्ठलवाडी पूर्वेला रॉयल रेसिडेन्सी समोर पार्क केलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेली आहे .याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .दुसऱ्या घटनेत डोंबिवली पूर्वेतील म्हात्रे नगर राजाजी रोड वरील ग्लोरी अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रमोद पुरुषोत्तम जोशी (४१) यांनी राथ रोडवरील साई पूजा हॉटेलच्या खाली पार्क केलेली मोटारसायकल चोरीला गेली आहे .याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

मंगळसूत्र चोरी

 कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागातील रघुनाथ म्हात्रे चाळीत राहणाऱ्या एका गृहिणीच्या घरातील ५१ ग्रेम वजनाचे आणि १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने चोरून नेले .याप्रकरणी दिलेल्या तक्रारी नुसार कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email