पिठाच्या चक्कीत ओढली गेल्याने महिलेचा मृत्यू; पुण्याच्या गोखलेनगर मधील घटना

पुणे – महिलांचे पदर विविध ठिकाणी अडकून झालेले अपघात अनेकांनी पाहिले, अनुभवले, ऐकले आहेत. मात्र चक्क पिठाच्या चक्कीत अडकून अपघात झाल्याची घटना पुणे शहरातील गोखलेनगर परिसरात सायंकाळच्या सुमारास घडली.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुप्रिया संदीप प्रधान (वय ४० रा.गोखलेनगर,पुणे)असे अपघातग्रस्त झालेल्या महिलेचे नाव आहे.

पीठ मळण्याच्या चक्कीत ओढणी अडकल्याने मोठा अपघात झाला आहे.या महिलेचा चेहरा चक्कीत अडकल्याने महिला गंभीर जखमी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या महिलेवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला असल्याचे समजते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email