पिंपरी शहरात आढळली चार पायाची कोंबडी
पिंपरी – कुतूबूद्दीन होबळे हे निगडी भक्ती शक्ती परीसरात चिकन सेंटर चालवतात. तेव्हा चिकन शॉपसाठी आलेल्या कोंबड्यांची पाहणी करत असतांना एका कामगाराने हि आगळी वेगळी कोंबडी कुतूबूद्दीन यांच्या निदर्शनास हि कोंबडी आणून दिली. हि चार पायाची कोंबडी पाहताच कुतूबूद्दीन होबळे आश्चर्यचकीत झाले.आणि त्यांनी या अद्भूत कोंबडीचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला.
हि कोंबडी पाहण्यासाठी परीसरातील नागरीक गर्दी करत आहेत. नागरीकांना या कोंबडीचे अप्रुप वाटत आहे. आज पंचवीस वर्षांपासून या व्यवसायात आहे. पण आयुष्यात पहील्यांदाच अशी कोंबडी पाहिल्याचे कूतूबूद्दीन होबळी यांनी सांगितले.अऩेक जऩ या चार पायाची कोंबडी बघुन हैराण झाले आहेत. काहींनी या कोंबडीला खरेदी करण्याची इच्छा दाखवली असून आपण कोणालाही हि कोंबडी देणार नसून उलट या कोंबडीचा आपण सांभाळ करणार असल्याचे कुतूबूद्दीन यांनी सांगितले.
वन्यजीव अभ्यासकांनी मात्र केवळ जनुकीय बदलामुळे अशा प्रकारचे जीव जन्माला येत असल्याचे सांगितले. ही चार पायाची कोंबडी चर्चेचा विषय ठरली असून तिला पाहण्यासाठी नागरीक गर्दी करत आहेत.
या प्रक्रीयेला पॉलिमेलीया म्हणतात. बीजफलन प्रक्रीयेतील असामान्य परीस्थिती किंवा जनुकीय बदलामुळे असे घडू शकते. कोंबडीचे आयुष्य साधारण दोन ते तीन वर्ष असते अशा प्रकारचे बदल असलेल्या कोंबड्या योग्य काळजी घेतल्यास इतर कोंबड्याप्रमाणेच तेवढाच काळ जगू शकतात असे प्राणी तज्ञांनी सांगितले.