पाहुणी बनून आलेल्या अल्पवयीन मुलीने लाखोंचे दागिने चोरले
डोंबिवली – आई वडील गावी गेल्याचा बहाणा करत घरात पाहुणी बनून आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरातील ३ लाख ८४ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात या अल्पवयीन मुली विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरात श्रीराज इमारती मध्ये राहणारे ज्योती बंगेरा यांच्या मुलीची १७ वर्षीय मैत्रीण माझे आई वडील बाहेर गेल्याचे सांगत पाहुनी म्हणून गत बुधवारी घरात राहण्यास आली. या दरम्यान या मुलीने त्यांची नजर चुकवून त्यांच्या घरातील ३ लाख ८४ हजारांचे दागिने चोरून नेले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: