पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

(म विजय)

पुणे – मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालय असलेल्या इमारतीवरून उडी मारून एका संगणक अभियंता तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, मुंढवा पोलीस तपास करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अश्विनी गवारे (वय २२, मूळ रा.शिरूर, जि.पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

मयत अश्विनी ही मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय असलेल्या झिरो वन या इमारतीत चौथ्या मजल्यावर असलेल्या ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होती. मात्र मागील एक आठव्यापुर्वी तिने राजीनामा सादर करून रजेवर होती. मात्र तिचा राजीनामा नाकारण्यात आला होता. दरम्यान ती आज सोमवार (दि.२९) सकाळी दहा साडेदहा वाजता कामावर आली होती. त्यानंतर तीने साडेअकराच्या सुमारास सातव्या मजल्यावर असलेल्या टेरेस वर जाऊन उडी मारली. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी ती काम करत असलेल्या कार्यालयात याबाबत सांगितल्यानंतर सगळ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तीने शांत डोक्याने टेरेस’वर जाऊन उडी मारली असावी अस अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तिने उडी मारण्यापूर्वी टेरेसच्या कठड्यावर तिचा चष्मा काढून ठेवला असलेला पोलिसांना आढळला, तर तिने ओढणी देखील तेथील एका पाईप’वर अडकवून ठेवलेली आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र मयत अश्विनी टेरेस’वर कशी गेली, कधी गेली याबाबत कोणालाही काहीही माहित नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

दरम्यान तिने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप कळु शकली नसली तरी, घरगुती वादातून तिने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुंढवा पोलीस तपास करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email