पालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचा-यांना जानेवारी महिन्याचे वेतन देण्याचा आदेश

डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेतील परिवहन सेवेतील कर्मचा-यांना गेले दोन महिने वेतन मिळत नसल्याने त्यांनी आज दुपारी अचानक चक्का जाम आंदोलन केले अखेर आयुक्त वेलारासु यांनी जानेवारी महिन्याचे वेतन देण्याचा आदेश दिला व परिवहन सेवेचे उत्पन्न वाढवण्यासादर्भात कारवाही करण्याचे निर्देश दिले. परिवहन सेवेतील जादा वाहक व चालक पालिकेच्या सेवेत वर्ग करावेत ,42 मुदत संपलेल्या बसेस निरलेकीत कराव्यात ,फायद्याचे 5/6मार्ग वगळता इतर तोट्यातील मार्ग बंद करण्याचे निर्देश दिले.
परिवहन सेवेचे खाजगीकरण करण्यासंदर्भात व उत्पन्न वाढवण्यासादर्भात 15 दिवसात अहवाल देण्याचे आदेश प्रभारी परिवहन उपायुक्त सुरेश पवार यांना दिले परिवहनचा आर्थिक बोजा कमी करण्यासंदर्भातही त्यांनी प्रयत्न करून मार्ग काढण्याचे निर्देश दिले. कर्मचा-यांनी परिवहन सेवेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचनाही केली आयुक्तांच्या आश्वासनानंतर चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email