पालिकेचे अनधिकृत बांधकामे  व  अनधिकृत नळजोडण्याकडे   दुर्लक्ष 

पालिकेचे अनधिकृत बांधकामे  व  अनधिकृत नळजोडण्याकडे   दुर्लक्ष 
   शिवसेना नगरसेवकाचे आमरण  उपोषण
डोंबिवली :_- दि. २६ ( प्रतिनिधी  ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत अनेक वर्षापासून शिवसेना – भाजपची सत्ता आहे. मात्र सत्ता असूनही पालिका प्रशासनावर अंकुश करण्यास ठेवण्यास सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचे दिसते.  अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत नळजोडण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कल्याण मधील  शिवसेना नगरसेवक गोरख जाधव  शिवाजी चौकात आमरण उपोषणास बसले आहेत.
     कल्याण नजीक असलेल्या आंबिवली ,अटाळी मध्ये सार्वजनिक हितकरिता आरक्षित असलेल्या  भूखंडावर चाळ माफियांनी अतिक्रमण करत अनधिकृत बांधकामे केली आहेत.  प्रभागात पालिकेच्या मुख्य जलवाहिणीला होल मारत अनधिकृत  नळजोडण्याही देण्यात आल्या आहेत. अप्रशिक्षित प्लंबर  जलवाहिन्याला जोडण्या देत असल्याने या होल मधून दूषित पाणी जलवाहिणीमध्ये गेल्याने  दुषित  पाणीपुरवठा होत आहे. .या प्रभागात सफाई कर्मचाऱ्यांची संख्यां अपुरी असल्याने गटार सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरत असून नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे .या प्रभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई,अनधिकृत बांधकम करणाऱ्यांवर एम आर टी पी अंतर्गत कारवाई,अनधिकृत नलजोडण्यांवर कारवाई,सफाई कर्मचाऱ्यामध्ये वाढ या मागण्यांसाठी शिवसेना नगरसेवक गोरख जाधव यांनी सातत्याने तक्रारी करत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत कारवाई ची मागणी केली होती .मात्र पालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप नगरसेवक जाधव यांनी केला आहे .अखेर प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आपल्या मागण्यांसाठी नगरसेवक  जाधव यांनी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत पालिका मुख्यलयानजीक छत्रपती शिवाजी चौकात बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. पालिका आपल्या मागण्या पूर्ण करणार नाही तोवर उपोषण  सुरूच राहणार असे जाधव यांनी यावेळी सांगितले .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email