पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना 8 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक
डोंबिवली:-दि.१३( प्रतिनिधी) कल्याण डोंबिवली महापालिकेत नेहमी चर्चेेत असलेले अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात ८ लाखांची लाच घेताना ठाणे अँटी करप्शनने रंगेहात पकडून अटक केली. पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नये यासाठी संजय घरत यांनी संबंधिताकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती ३५ लाख रुपये देण्याचे निश्चित ठरले. त्यापैकी पहिला ८लाखांचा हफ्ता आपल्याच कार्यालयात घेताना ठाणे अँटी करप्शन विभागाने त्यांना पकडले.दरम्यान नेहमीच चर्चेत राहणारे आणि वादग्रस्त अधिकारी अशी प्रतिमा असणाऱ्या घरत यांना पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसल्याने राजकीय वर्तुळात पसरली. घरत हे कल्याण डोंबिवली शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Please follow and like us: