पालिकेकडून गौरवण्यात आलेल्या उर्दू शाळेला पालिकेचीच सापत्न वागणूक १७ ओक्टोंबर रोजी काढणार मोर्चा

कल्याण दि.०२ – कल्याण डोंबिवली महापालिकेची बनेली येथे बंदे अली खा हि उर्दू शाळा असून या शाळेला पालिकेच्या शिक्षण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकी विरोधात येत्या १७ ओक्टोबर रोजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांसह पालिका मुख्यालयावर मोर्चाचा इशारा नजीम रईस यांनी दिला आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या शहरातील उर्दू शाळा पट संख्ये अभावी बंद पडल्या असल्या तरी आंबिवली जवळील बनेली शाळेत बालवाडी ते आठवी पर्यत १८५९ विद्यार्थी शिकतात. मात्र शाळेच्या केवळ चार वर्गखोल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना एका वेळी बसता येत नसल्यामुळे या शाळेत सकाळी ७ ते ११, ११ ते २.३० आणि ३ ते ६ अशा तीन शिफ्ट मध्ये शाळा भरवली जाते. यातही विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसवावे लागते. यामुळेच वर्गखोल्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. मात्र शालेन्जिक असलेला राखीव भूखंड महापालिकेच्या ताब्यात नसल्यामुळे सर्वशिक्षा अभियानातून मंजूर असलेल्या ४० लाख रुपये निधी पडून आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी उंभर्णी येथील उर्दू शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मोठ्या गाजवाजात करण्यात आलेमात्र ग्रामस्थांनी उर्दू शाळेला विरोध केल्यामुळे भूमिपूजन होऊन वर्ष उलटले तरी महापालिकेला तिथे बांधकाम करता आलेले नाही.

यामुळेच व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोहेल रईस यांनी आपली ३ गुंठे जागा विना मोबदला बक्षीस पत्रा द्वारे शिक्षण विभागाला देत यात सर्व शिक्षा अभियानातील निधी मधून वर्गखोल्या बांधण्याची मागणी केली आहे. मात्र पालिकेच्या शिक्षण विभागाकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या शाळेत असलेल्या विद्यार्थ्याची संख्या पाहता १८ शिक्षक अपुरे असून शिक्षक वाढविण्याची मागणी देखील प्रलंबित ठेवण्यात आली असून शाळेची सफाई शिक्षक आणि विद्यार्थ्यांना करावी लागत असून वारंवर सफाई कामगाराची मागणी करूनही सफाई कामगार उपलब्ध करून दिले जात नसल्यामुले पालक विद्यार्थी ग्रामस्था मध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

शाळेच्या गैरसोयी बद्दल उपमहापौर उपेक्षा भोईर,शिवसेनेचे शाखा प्रमुख नजीफ रईस,नगरसेविका सुनंदा कोट,सरफराज रईस, सोहेल रईस यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली तसेच पालिका उर्दू शाळेला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप करत येत्या १७ ऑक्टोबर रोजी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याबाबत निवेदन सादर केले आहे याबाबत पालिकेच्या शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी वर्गखोल्या बांधण्याचा प्रस्ताव निविदा प्रक्रियेत असल्याचे सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email