पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात,शाळेसमोरील कचराकुंडी हटवण्याची शिवसेनेची मागणी

 ( श्रीराम कांदु )
 डोंबिवली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा टिकवण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे पालिकेच्या आरोग्य विभागांचे मात्र या शाळेतील विद्यार्थ्यांचे  आरोग्यांकडे  दुर्लक्ष होत आहे. या शाळांसमोर कचराकुंडी असल्याने  साथीचे रोग  पसरण्याची शक्यता असल्याने शिवसेनेने यावर पालिका प्रशासनाल  जागे प्रयत्न  केला आहे . डोंबिवली पूर्वेकडील   आयरे गाव   येथील पालिका शाळेसमोरील कचराकुंडी हटवण्याबाबत पालिकेचे उपायुक्त सु. रा. पवार यांना पत्र दिले आहे.
  शिवसेना डोंबिवली महिला आघाडीच्या कार्यकर्त्या निष्ठा नारायणकांत भागवतुला  यांच्यासह नारायणकांत भागवतुला, तेजस महागांवकर, डॉ. मीनाक्षी धुंदे-संघवी, ज्योत्स्ना जोशी, वमसी नेमानी, जयश्री माळी, अरुणा देशमुख, स्नेहा पराडकर, अंजली ठक्कर (ज्योती पुजारी),  हल्पतराव इत्यादिनी महापौर राजेंद्र देवळेकर , शिक्षण समिती सभापती  वैजयंती गुजर-घोलप  यांनाही याबाबतचे निवेदन दिले आहे. प्रभाग क्र.- ६६ मध्ये असणाऱ्या डोंबिवली  पूर्वेकडील आयरे गाव येथील क.डों.म.पा. शाळा क्र.- २१, लालबहादूर शास्त्री विद्यालयाला  लागून  शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची एक मोठी टाकी आहे. याच ठिकाणी बोअरवेल (पाण्याचा हापसा) देखील आहे. या पाण्याच्या टाकीलगतच एक  कचराकुंडी  ठेवण्यात आली आहे. या कचराकुंडीमुळे शाळेच्या  परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शाळेतील मुख्यध्यापक आणि शिक्षकवर्गांनी  वारंवार पालिका  प्रशासनाला  शालशाळेसमोरील कचराकुंडी हटवण्याचा विंनती केली. मात्र पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने आजवर हि कचराकुंडी का काढली नाही असा प्रश्न पालकांना पडला आहे. या प्रभागातील नगरसेवकांनी या कडे लक्ष देणे गरजेचे होते असे पालकांचे  म्हणणे आहे. दरम्यान डोंबिवलीतील पालिकेच्या अनेक शाळेसमोर कचराकुंडी असून त्या हलवण्याबाबत पालिका प्रशासन कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email