पालिका आयुक्तांनी केली डोंबिवलीतील आपत्कालीन कक्षाची पाहणी
डोंबिवली दि.१९ – डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात असलेल्या आपत्कालीन कक्षाची पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी सोमवारी पाहणी केली. या कक्षातील कर्मचाऱ्याची नोंद वही, फोन आणि साहित्यांची माहिती घेतली. सुदृड कर्मचारी सुदृश कक्षात नियुक्त करण्यात येणार असून हे कक्ष लवकरच पालिकेच्या कार्यालयात हलविण्यात येईल असे बोडके यांनी सांगितले. मात्र अचानक आयुक्तांच्या पाहणीमुळे कर्मचारी धावपळ झाली.
डोंबिवलीतील आपत्कालीन कक्ष धोकादायक झाले असून यातील साहित्य वापरजोगे नाहीत. तर येथील व्होकीटाँकिवरून अग्निशामक दलाला संपर्क केला असता संपर्क झाला नाही. यावर पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांन विचारणा केली. या कक्षातील प्रथमोपचार पेटीत औषधे नसल्याबाबतही आयुक्तांनी विचारले असता औषधे असल्याचे त्यांना सांगण्यात आले. या कक्षातील काही कर्मचारी आजारी असल्याने आपत्कालीन परिस्थितीत काम करताना अवघड जाते. त्यामुळे सुदृड कर्मचारी नियुक्त करण्यात आहे. दरम्यान पालिकेच्या कार्यालयात ज्या ठिकाणी आधार कार्ड केंद्र सुरु केले आहे. त्या ठिकाणची जागा मोठी असल्याने या ठिकाणी आपत्कालीन कक्ष सुरु होणार आहे.