पालकांनो मुलींना मारु नका, त्या आम्हाला सांभाळायला द्या

बीड – जिल्ह्यात मुली मोठ्या प्रमाणात मारल्या जात आहेत. पालकांनी कुठल्याही कारणाने मुलींचा सांभाळ करावयाचा नसेल तर त्यांनी त्या मुली आमच्या पदरात टाकाव्यात परंतु त्यांना मारुन टाकू नये, असे आवाहन सहारा बालग्रामचे संतोष गर्जे यांनी केले आहे.

काल बीडमध्ये आईने आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलींना पाण्याच्या हौदात बुडवून मारल्याची हृदयद्रावक घटना घडली. कारण कुठलेही असो, परंतु मुली मारुन टाकू नका.

मुलींना सांभाळण्यासाठी आम्ही आहोत. त्यांना आमच्या पदरात टाका.आम्ही त्यांना शिकवू, मोठं करु. आमच्याकडे मुली आणून देणार्‍यांचे नाव गुप्त ठेवले जाईल.

गेल्या १३ वर्षापासून अनाथ मुले-मुली सांभाळण्याचा प्रकल्प आम्ही लोकसहभागातून चालवत आहोत. कालच्या घटनेने आम्ही हादरुन गेलो आहोत. कुणाच्या मनात काही आल्यास आम्हाला फोन करा, आम्ही त्या मुलींना तुमच्या घरी येऊन घेऊन जाऊ, असेही संतोष गर्जे यांनी म्हटले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email