पारसिकनगर, डोंबिवली गणेशघाट भागात अवैध रेतीसाठीचे ४३ हौद तोडले
पारसिकनगर, डोंबिवली गणेशघाट भागात अवैध रेतीसाठीचे ४३ हौद तोडले
७८ ब्रास रेतीही जप्त
ठाणे दि २०: अवैध रेती उत्खाननाविरुध्दची कारवाई जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशाप्रमाणे परत तीव्र करण्यात आली आहे. रेती उत्खनन आणि वाहतुकीच्या तक्रारी आल्यामुळे काल डोंबिवली शिवाजीनगर गणेशघाट भागात जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करून या भागातील सिमेंटचे ६ हौद जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केले तर ८ ब्रास रेतीसाठा जप्त केला. कल्याण तहसील कार्यालय, तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील रेतीगट शाखेचे पथक, व विष्णूनगर पोलीस यांनी काल दुपारी कुंभारखानपाडा गणेशघाट येथे धाड टाकली. याठिकाणी रेतीसाठा आढळून आला तो ताब्यात घेतला तसेच सिमेंटचे हौद जेसीबीच्या सहय्याने तोडून टाकले असे तहसीलदार अमीत सानप यांनी सांगितले. जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुध्द विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
आज सकाळपासून उपजिल्हाधिकारी पुनर्वसन संगीता टकले, रेतीगट शाखेचे तहसीलदार मुकेश पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार तसेच पोलीस यांच्या पथकांनी पारसिकनगर येथील गणेशघाट परिसरात धड टाकून ७० ब्रास रेतीसाठा जप्त केला. यावेळी याठिकाणी साठा करण्यासाठी असलेले ३७ हौद जेसीबीच्या सहय्य्याने तोडण्यात आले.