पारशी समुदायाच्या पवित्र वास्तूंबाबत मुख्यमंत्र्यांनी केले धर्मगुरूंच्या शंकांचे निरसन,मेट्रोचे काम विश्वासात घेऊनच करण्याची ग्वाही

( म विजय )
पारशी समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरू वडा दस्तूरजी डॉ. फिरोज कोतवाल आणि वडा दस्तूरजी खुर्शिद दस्तूर यांनी आज रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ न मेट्रो 3च्या कामामुळे 2 पारशी अग्यारी आणि पवित्र भिकाजी बेहरम विहिरीसंदर्भातील आपल्या शंका उपस्थित केल्या. आमदार आशिष शेलार आणि एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यावेळी उपस्थित होत्या.
पारशी समुदायाने मुंबईच्या विकासात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल आपल्या मनात सर्वोच्च आदरभावना आहेत, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल तसेच या संपूर्ण कामात त्यांना पूर्णपणे विश्वासात घेतले जाईल. या पवित्र अग्यारींचे पावित्र्य कायम राखून ठेवत मेट्रो 3 ने आपले काम करावे, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले. टनेलचे काम करताना जुन्या हेरिटेज इमारतींना धोका पोचणार नाही, याची सुद्धा संपूर्ण काळजी घेऊन या ईमारतींपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी निर्देशित केले. एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या सर्व पवित्र आणि ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेऊनच तसेच सुरक्षेच्या संपूर्ण उपाययोजना करूनच कामाची आखणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री आणि पारशी समुदायाच्या धर्मगुरूंना आश्वस्त केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email