पान उधार न दिल्याने पानटपरीमालकासह त्याच्या मुलाला मारहाण
कल्याण दि.११ – पान उधार न दिल्याने संतापलेल्या तरुणाच्या टोळीने पान टपरी मालकासह त्याच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. या प्रकरणी कोल्शेवाडी पोलिसांनी साजन शिंदे ,सोन्या उर्फ भोले,साजनचा भाऊ ,वेद तिवारी उर्फ गोलू,कृष्णा पडेकर ,अबू व त्याचे तीन ते चार साथीदारा विरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
कल्याण पूर्वेकडील कैलास नगर परिसरात राहणाऱ्या रणजीत दुबे याच्या वडिलाचे मिलिंद नगर येथील शिवपुरम येथे दुबे पान शॉप आहे .रविवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास साजन शिंदे ,सोन्या उर्फ भोले,साजनचा भाऊ हे तिघे दुकानात आले त्यांनी पान उधार मागितले मात्र त्यांनी उधार देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तिघांनी दुबे यांच्या वडिलांना शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यानी मारहाण केली .वडिलांना मारहाण होत असल्याने रणजीत भांडण सोडवण्यास गेला असता या तिघांसह त्याच्या साथीदारानी त्यांला धक्का बुक्की करत या दोघांना लोखंडी रोड व चाकूने हल्ला चढवला या हल्ल्यात हे दोघे जखमी झाले असून या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात अली आहे. या तक्रारी नुसार पोलिसांनी साजन शिंदे ,सोन्या उर्फ भोले,साजनचा भाऊ ,वेद तिवारी उर्फ गोलू,कृष्णा पडेकर ,अबू व त्याचे तीन ते चार साथीदारा विरोधात गुन्हे दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .