पादचाऱ्याची बॅग लंपास 

डोंबिवली – पादचारी तरुणालाला अंगावर मुंग्या पडल्याचे भासवून त्यांच्या हातातील 50 हजारांची पैशांची बॅग लंपास करणाऱ्या दोन अनोळखी मोटरसायकल स्वरांविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    मलंग रोडवरील द्वारली गावात राहणारे निलेश पवार हे गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील युनियन बँकेतून 50 हजार रुपये काढून घरी पायी चालले होते.त्यावेळी मोटरसायकल वरून दोन तरुण आले आणि पवार यांना अंगावर मुंग्या पडल्या आहेत असे सांगितले.त्यांनी त्यांच्या हातातील पैशांची बॅग बाजूला ठेवून मुंग्या साफ करण्यासाठी पाणी घेत असताना,त्या दोघा चोरट्यांनी सदर बॅग लंपास करून मोटरसायकल वरून धूम ठोकली.पवार यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email