पादचाऱ्याकडून १ लाख ८० हजारांची रोकड लांबवली – डोंबिवलीतील घटना
कल्याण दि.०६ – डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड स्टार कॉलनी येथील साई रेसिडन्सी मध्ये राहणारे रजनीकांत चव्हाण शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सूमारास डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश हॉल समोरून जात असताना चार अज्ञात इसमाने त्याना हटकले. चव्हाण यांना काही समजण्याच्या आधीच क्षणार्धात त्यांच्या हातातील १ लाख ८० हजार रोकड असलेली पिशवी हिसकावून तेथून पळ काढला या प्रकरणी चव्हाण यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अद्न्यत चार लुटारू विरोधात गुन्हा दाखल केला असून या चार लुटारूंचा तपास सुरू केला आहे.
Please follow and like us: