पाच दिवसात ३२ हजार स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यासाठी कर्मचाऱ्यांची दमछाक …

पाच दिवसात ३२ हजार स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यासाठी कर्मचाऱ्यांची दमछाक …

    डोंबिवली :-  

   केंद्र सरकारने देशातील स्वच्छतेवर स्वच्छता अॅप हा तोडगा काढला असला तरी पालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी हि डोकेदुकी ठरल्याचे चित्र दिसत आहे. शहर स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाला नागरिकांची साथ मिळावी म्हणून सुरु केलेल्या स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यासाठी कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. गेल्या आठ दिवसात कल्याण-डोंबिवली आणि नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावात आतापर्यत ५ हजार ८०० स्वच्छता अॅप डाऊनलोड झाले आहे. तर कल्याण –डोबीवलीची लोकसंख्या १६ लाख असून त्या तुलनेत पाच दिवसात ३२ हजार स्वच्छता अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. परंतु स्वच्छता अॅपमुळे शहरातील कचरा प्रश्न सुटणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

       २०१६ साली स्वच्छता अॅप सुरु झाले. जास्तीत जास्त नागरिकांनी हा अॅप डाऊनलोड करावा यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना टार्गेट दिले आहे. पालिकेत ४ ते ५ हजार कर्मचारी असून प्रत्येक कर्मचाऱ्याने १० नागरिकांकडून हा अॅप डाऊनलोड करणे आवश्यक  आहे. त्यामुळे कर्मचारी या कामात गुंतले आहेत . उद्या सोमवारी डोंबिवली पूर्व आणि पश्चिमकडील स्टेशनपरिसरात पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्टाॅल टाकण्यात येणार आहे. यावेळीनागरिकांना या अॅपचे महत्व समजावून अॅप डाऊनलोड करण्यास नागरिकांना विनंती केली जाणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापक प्रमुख विलास जोशी यांनी सांगितले. या अॅप मध्ये एखाद्या नागरिकांनी कचरासंदर्भात तक्रार नोंदवल्यानंतर १६ , २४ आणि ४८ तासांत या तक्रारीचे निवारण करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांना हा अॅप डाऊनलोड करून देईल त्या कर्मचाऱ्याला पालिकेच्या वतीने बक्षीस दिले जाणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email