पाकिस्तानविरोधात शिवसेनेचे डोंबिवलीत निषेध आंदोलन

(श्रीराम कांदु)

 पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांच्या भेटी दरम्यान पाक अधिकाऱ्यांनी केलेला महिलांचा अपमानवर देशभरात निदर्शने आणि आंदोलन होत आहे. डोंबिवलीतील इंदिरा चौकात शिवसेनेने पाकिस्तानविरोधार जोरदार घोषणाबाजी केली.  हा त्यांच्या अपमान नसून संपूर्ण भारत देशाचा अपमान आहे. हे शिवसेना कदापि सहन करणार नाही असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे व शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख तथा सभागृह नेते राजेश मोरे यांनी इंदिरा चौकात केलेल्या निषेध आंदोलनावेळी सांगितले. आंदोलनावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळून शिवसेना निषेध करणार होती . मात्र पोलिसांनी याला विरोध केला. यानंतर जमलेल्या शिवसैनिकांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानविरोधात निषेध करणारे पोस्टकार्ड दिल्लीला पाठवण्यात येईल असे यावेळी वैशाली दरेकर – राणे यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक तात्या माने , उपशहर प्रमुख  संतोष चव्हाण , महिला आघाडी उपजिल्हा संघटक स्मिता बाबर , कल्याण-डोंबिवली महानगर संघटक वैशाली दरेकर – राणे , कल्याण-डोंबिवली महानगर सहसंघटक निष्ठाभागवततुला , महिला शहर संघटक  मंगला सुळे , किरण मोंडकर , तुषार शिंदे  , श्रीकांत बिरमुळे  आदीसह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email