पश्चिम रेल्वेने करोडो केला रुपयांचा दंड वसूल
मुंबई- विना तिकिट प्रवास करणे,अहस्तांतरणीय तिकिट हस्तांतरित करणे,अशा विविध प्रकरणी कारवाई करत पश्चिम रेल्वेने करोडो रुपयांचा दंड वसूल केला आहे.डिसेंबर महिन्यात कारवाई करत हा दंड वसूल करण्यात आला असुन ही कारवाई अशीच चालू राहणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या टिकिट तापासनिसांनी १लाख ८३ हजार प्रवाशांवर करवाई करत सुमारे ७ कोटी रूपये दंड वसूल केला आहे.यात विनातिकिट प्रवासी यांच्यासह डब्यातील फेरीवाले भिकारी यांच्यावरही करवाई करण्यात आली होती.दरम्यान ही कारवाई अशीच चालू राहणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
Please follow and like us: