पश्चिम डोंबिवलीत जोंधळे शालेजवळील , रस्ता दुरुस्त न केल्यास सोमवारी रिक्षा बंद

श्रीराम कांदु
डोंबिवली पश्चिम डोंबिवलीतील जोंधळे शालेजवळील रस्ता अंत्यत खराब अवस्थेत असून त्या भागात धुळीचे साम्राज्य आहे येत्या दोन दिवसात रस्त्याची दुरुस्ती न केल्यास सोमवारी रिक्षा बंद आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा चालक मालक युनियनने दिला आहे
जोंधळे शालेजवळील रस्ता दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे यामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून परिणामी रिक्षा चालक व नागरिक त्रस्त आहेत या संदर्भात शेखर जोशी यांच्या नेतूत्वाखाली शिष्टमंडळाने आज ‘ह ‘प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांची भेट घेऊन त्यांना रस्ता दुरुस्त न केल्यास सोमवारी पश्चिम डोंबिवलीतील रिक्षा बंद ठेवण्याचा इशारा दिला सर्व रिक्षा चालक तोंडावर फडके बांधून आले होते या संदर्भात उपअभियंता सुभाष भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले ज्याला हे काम देण्यात आले त्याने अर्धवट काम केले असून डांबर टाकन्याचे काम नव्हते मात्र पालिका ते काम पूर्ण करील असे आश्वासन दिले.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email