पश्चिमी नौदल कमांडच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात तिसऱ्या हाफ मॅरेथॉनसाठी 15 हजारांवर जणांची नोंदणी
मुंबई – पश्चिमी नौदल कमांड सुवर्णमहोत्सव साजरा करत असून इंडियन ऑईल डब्ल्यूएनसी नौदल अर्ध मॅरेथॉन 18 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
नौदल दिनानिमित्त पश्चिमी नौदल कमांडने आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम आहे. यावर्षी 15 हजारांहून अधिक धावपटूंनी या हा अर्ध मॅरेथॉनसाठी नोंदणी केली आहे.
एअरक्राफ्ट कॅरिअर रन (21 किमी), डिस्ट्रॉचर रन (10 किमी), फ्रिजेट रन (5 किमी) आणि ड्रीम रन अशा चार श्रेणीत याचे विभाजन करण्यात आले आहे.
सर्व नागरिक तसेच परदेशी नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. 5 किमीसाठी वयोमर्यादा 12 वर्षे असून 10 किमीसाठी 16 वर्षे तर 21 किमीसाठी 18 वर्षे आहे.
पश्चिमी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथरा हे प्रमुख पाहुणे असतील.
पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि खुल्या गटातील मुलांचे स्वतंत्रपणे मूल्यांकन केले जाईल.