पलावा मध्ये चोरट्याचा सुळसुळाट – डोंबिवलीतील घटना

डोंबिवली दि.०४ – डोंबिवली पूर्वेकडील खोणी येथील हायप्रोफाइल सोसायटी मध्ये गेल्या काही महिन्यापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून येथील नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. या सोसायटी असलेली कडेकोट खाजगी सुरक्षा व्यवस्था भेदून या चोऱ्या होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच काल पलावा लेक साईड बिल्डींग च्या आवारात ठेवलेला १६ हजार आठशे रुपये किमतीचे बांधकाम साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघड झाले. दर बाब निदर्शनास आल्या नंतर या प्रकरणी सुपरवायझर ने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email