परीक्षेत मिळणारे गुण म्हणजे बुध्दीमत्तेचे मोजमाप नाही – मीनू गांधी

 (श्रीराम कांदु)

डोंबिवली :-  परीक्षेत मिळणारे गुण म्हणजे बुध्दीमत्तेचे मोजमाप नाही.इतर मुलांशी तुलना करुन सर्वाधिक गुण मिळविण्याच्या स्पर्धेत मुलांवर दडपण न आणता त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात बुध्दीमत्ता वाढविण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन देऊन आपल्या पाल्याला तो स्वतःचा प्रेरणास्रोत कसा होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मीनू गांधी यांनी सक्षम विद्यार्थी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले.           ईगल ब्रिगेड  व मी माझा मोटिवेटर यांच्यातर्फे या कार्यशाळेचे आयोजन सर्वेश सभागृह येथे करण्यात आले होते.  त्याला विद्यार्थी व पालक यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.आपल्या उज्वल भवितव्यासाठी नियोजन पूर्ण  अभ्यास करुन,  आकलन शक्ती वाढवून , प्रत्येक  विद्यार्थ्यांना आपण स्वतःच ‘मीच माझा मोटिवेटर’ कसे होता येईल हे सोप्या भाषेत विविध प्रात्यक्षिकांसह विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करणारी कार्यशाळा संपन्न झाली.  यात  अभ्यास करताना प्रामुख्याने लेखन ,वाचन,पाठांतर यावर भर देऊन  विषयांचे वर्गीकरण कसे करायचे.दिवसभराचा दिनक्रम ठरवून वेळापत्रकाचे नियोजन व त्यानुसार अभ्यास करताना एकाग्रता कालावधी ओळखणे व हळूहळू तो कसा वाढवायचा हे करताना जबरदस्तीने अभ्यास न करता मध्ये विरंगुळा,मानोरंजन यांचा आधार घेऊन प्रसन्न मनाने कसा करायचा हे प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना समजाविण्यात आले. “परिक्षेच्या भितीवर नियोजनाने मात करण्यासाठी नक्की सुरुवात कुठल्या विषयाने करावी, किती वेळ अभ्यास करावा, योग्य अभ्यास पद्धती कोणत्या, मी स्वतःचा अभ्यास सलग किती वेळ करु शकतो /शकते, यासाठी ) योग्य अभ्यास सवयी आणि पद्धति कोणत्या,परीक्षा काळात घ्यावयाची शरीर स्वास्थ्याची योग्य  काळजी ,अवांतर वाचनातून शब्दसंग्रह वाढविण्याचे महत्व , मोबाईल व इंटरनेटचा अभ्सासाठी कसा उपयोग करता येईल? अभ्यासात सांकेतीकरण व विस्तारीकरणाचे महत्व  अशा अनेक विषयांवर गांधी व वृषाली गोखले यांनी मार्गदर्शन केले .सारिका बिवलकर यांनी ताण तणाव कमी करुन मन व शरीर ताजेतवाने राखण्यासाठी प्राणिक हिलिंग च्या सहाय्याने ‘सुपर ब्रेन योगा’ द्वारे विद्यार्थ्यांना आभ्यास करता करता सहज करता येणारे प्रकार दाखविले व करुन घेतले ज्यामुळे अभ्यासाचा तणाव कमी होउ शकेल.  या कार्यशाळेत उपस्थित पालक ,विद्यार्थी  व तज्ञ तसेच आयोजक यांचा एक ‘व्हाट्स अप ‘ग्रुप तयार करण्यात आला असून यावर तज्ञांकडून आवश्यक तेव्हा सामुपदेशन व शंकानिरसन करण्याथा येणार आहे. डोंबिवलीत सर्वच क्षेत्रातील तज्ञआहेत त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा ऊपयोग भावी पिढीला करुन देण्यासाठी अशा वेगवेगळ्या कार्यशाळांचे यापुढे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्यची माहीती वृषाली गोखले व विश्वनाथ बिवलकर यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email