परीक्षेत कमी गुण मिळाल्याने सातवीत शिकणा-या मुस्कानचा गळफास

डोंबिवली पूर्वेतील गोपाळ नगर,गल्ली नंबर 2 परिसरात मुस्कान राहत होती. गुरूवारी रात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. मुस्कान ही मंजूनाथ शाळेत  इंग्रजी माध्यम सातवी इयत्तेत शिकत होती. परीक्षेत हिंदी विषयात तिला कमी गुण मिळाले होते. तसेच दिवाळीचा गृहपाठ तिने केला नव्हता या कारणामुळे शाळेतील शिक्षक तिच्यावर रागावले होते शिक्षकांनी तिला मुख्याध्यापिकांकडे घेऊन गेले होते. .त्यावेळी मुख्याध्यापिकांनी तिला पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले होते. पालकांना शाळेत बोलावल्यानं ती तणावाखाली होती. मात्र आई वडीलांना याबाबत तिने काहीच सांगितले नव्हते. या तणाखालीच तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email