परिवहन समिती व शिक्षण समितीची निवडणूक बिनविरोध, दहा प्रभाग समित्या पण बिविरोध

( बालकृष्ण मोरे )

कल्याण / कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सभापतीची व शिक्षण मंडळ सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. परिवहन सभापती पदी सेनेचे मनोज गणपत चौधरी तर शिक्षण समिती सभापती पदी सेनेच्या नमिता मयूर पाटील या दोघांची निवड बिनविरोध झाली आहे. सोमवारी या सभापती पदा साठी अर्ज दाखल करायचे होते.या दोन्ही पदा साठी एक एक अर्ज दाखल झाल्याने ही दोन्ही सभापतीची पदे बिनविरोध निवडून आली आहेत.

या बरोबरच दहा प्रभाग समितीच्या सभापती पदाच्या निवडणुका देखील बिनविरोध झाल्या आहेत.येथे ही एक एक अर्ज दाखल करण्यात आल्याने या दहा प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.यात “ए” प्रभाग ते “जे” प्रभाग पदी अनुक्रमे दया शेट्टी , नीलिमा पाटील, राजवंती मढवी, रुपाली म्हात्रे, विश्वजित पवार, दीपाली पाटील, वृषाली जोशी, विमल भोईर, गणेश भाने हे प्रभाग समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवडून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.