परळ येथील हिंदमाता परिसरात असलेल्या क्रिस्टल टॉवर इमारतीला आग

मुंबई दि.२२ – परळ येथील हिंदमाता परिसरात असलेल्या क्रिस्टल टॉवर या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. शॉर्टसक्रिटमुळे इमारतीत आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. निवासी इमारतीला आग लागल्यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांना क्रेनच्या सहाय्याने इमारतीतून बाहेर काढण्यात येत आहे.

१६ मजली या इमारतीत १२ व्या मजल्यावर रिनोवेशनचे काम सुरू होते. कामादरम्यान शॉर्टसक्रिट झाले आणि आगीने भडका घेतला. या आगीत १२ व्या मजल्यावरची चारही घरं जळून खाक झाली. तसेच इमारतीत फायर फायटिंग सिस्टिम कार्यरत नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आग नियंत्रणात आणायला वेळ लागला. अतिरिक्त गाड्या आणि सामान आणावे लागले. याचा फटका तिथल्या रहिवाश्यांना बसला. दरम्यान, या घटनेची पूर्ण चौकशी केली जाणार असून इमारतीच्या बिल्डरवर आणि मॅनेजमेन्टवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email