परदेशी ट्रीप व जमीन विक्री करून देण्याचे आमिष दाखवून लाखोना गंडा

कल्याण – परदेशी ट्रीपला पाठवतो व गावाकडची जमीन विक्री करून देतो असे आमिष दाखवत बंटी बबली ने एका इसमाला तब्बल ७ लाख ६० हजारांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी उमेश बंगेरा व अनिता बंगेरा या दोघा बंटी बबली विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
 कल्याण नजीक असलेल्या आंबिवली मोहने नवकार हाईटस येथे राहणारे दिवाकर सालियन ६१ यांना कल्याणमधे राहणारे उमेश बंगेरा आणि अनिता बंगेरा या दाम्पत्याने गावाकडील ओळखीचा फायदा घेत तुम्हाला परदेशी ट्रीपचे आयोजन करून देतो तसेच तुमची गावाकडील जमीन विकून देण्याचे आमिष दाखवत त्याच्याकडून मागील दोन वर्षात तब्बल ७ लाख ६० हजार रुपये घेतले .मात्र बराच कालावधी लोटूनही ट्रीप बाबत काहीच झाले नाही तसेच जमीन न विकली गेल्याने सालियन यांनी या दोघांकडे पैसे परत देण्याची मागणी केली .बांगर यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देत नंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली .आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.