परदेशात नोकरीचे आमिष दाखवून महिला डॉकटरला १३ लाखांचा गंडा – डोंबिवलीतील घटना
डोंबिवली दि.२७ – परदेशातील हॉस्पिटल मध्ये लब टेक्नीशियन ची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका डॉक्टर महिलेला तब्बल १३ लाखांचा गंडवल्याची घटना डोंबिवली पूर्वेत उघडकीस आली आहे. या प्रकरणी सदर फसवणूक झालेल्या महिलेने टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.डोंबिवली पुर्वेकडील गोपाळ नगर नीलकंठ कृपा सोसायटी मध्ये राहणाऱ्या प्राची पुरंदरे या डॉक्टर आहेत.
हेही वाचा :- गावठी दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल – डोंबिवलीती घटना
त्यांना जून महिन्यात एका भामट्याने त्यांच्या ईमेल आयडी वर मेल करत अबूधाबी येथे मेडिकल लब मध्ये टेक्नीशियन पदाची नोकरी असल्याची माहिती दिली .त्यानंतर या भामट्याने प्राची यांना विविध नंबर वरून मोबाईल वर संपर्क साधत नोकरी लागल्याचे पत्र व स्टाफ आयडी मेल वर पाठवून प्राची यांच्याकडे विविध बँक खात्यावर तब्बल १३ लाख २ हजार ६०७ रुपये भरण्यास सांगितले. मात्र पैसे देऊन महिना भराचा कालावधी लोटला मात्र नोकरीबाबत काहीच आश्वसन मिळत नसल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .