पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांना ठार मारण्याची धमकी 

नीट वागा नाहीतर तुमचाही मुंडे करू !

अज्ञात व्यक्तीकडून आयुक्तांना पत्र 

(प्रशांत शेडगे)

पनवेल : पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांना अज्ञान व्यक्तीने पत्र पाठवून वागणुकीत बदल कर अन्यथा गोळ्या घालून ठार मारू अशी धमकी दिल्याने पालिका प्रशासनाचे कर्मचारी तसेच पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली आहे .

पनवेल महापालिकेचे पहिले आयुक्त म्हणून शिंदे यांनी कार्यभार स्वीकारल्यावर अतिक्रमण मोहीम राबवली होती . त्यावेळीस सुद्धा आयुक्तांच्या वर काही जणांचा रोष होता . महापालिका निवडणुकीच्या आधी केलेली वीट भट्यान वरील कारवाई सुद्धा बरीच गाजली होती .निवडणुकीच्या दरम्यान काही कारणास्तव त्यांना काही काळा साठी बदली करून उल्हासनगर येथे आयुक्त म्हुणुन तात्पुरता कार्यभार दिला होता . निवडुकी नंतर  परत पनवेल येथे रुजू झाल्यावर विकासाच्या मुद्द्यावर साताधारी तसेच विरोधकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती . झालेल्या प्रत्येक महासभेत आयुक्तांवर काही कारणाने लोकप्रतिनिधींकडून आरोप करण्यात आले होते . राज्य शासनाच्या वतीने चीन येथे अभ्यास दौऱ्याला जाण्याच्या एक दिवस आधी पालिका मुख्यालयात आयुक्तांच्या नावाने निनावी पत्र आले होते . आयुक्त चीन दौऱ्यावर असल्याने ते पत्र  न उघडता तसेच ठेवण्यात आले होते . गेल्या दोन दिवसा पूर्वी ते पत्र उघडल्यावर देण्यात आलेली धमकीची बाब समोर आली . सुरवातीला आयुक्तांनी हा विषय गंभीर न घेता ते पत्र तसेच ठेवण्यात आले . परंतु उपायुक्त जमीर लेंगरेकर आणि संध्या बावनकुळे यांनी आग्रह केल्यामुळे पोलीस आयुक्तांना धमकीचे पत्र पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे . अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या पत्रात असे म्हंटले आहे ,कि आपण स्वतःला राज्यातले कर्तबगार आयुक्त समजत असाल मात्र हा गैरसमज आहे . याचे काही तपशीलावर पुरावे देण्यासाठी हा खटाटोप केला आहे . पनवेलमधील आपली कारकीर्ती संपल्यानंतर ते आपल्याला समजेल . आपला समाजहिताचा मुखवटा मी आपली कारकीर्त संपवूनच जनतेसमोर आणणार आहे . मी आपल्याला अनेकदा त्या बद्दल प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बजावले मात्र आपण त्या कडे दुर्लक्ष करताय. यामुळे मला आपल्याला संपवल्याखेरीज पर्याय राहिलेला नाही . त्या साठी तुम्हाला पनवेल मधून तडीपार करणार हे सुद्धा लक्षात घ्या . हे मिटवायचे असल्याचं मी सांगतो ते शेवटचे ध्यानात घ्य . अजूनही वेळ गेली नाही . काही मूठभर लोकांसाठी तुम्ही रस्त्याशेजारच्या गाळाधारकांवर आणि लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या विकासकामांच्या मध्ये अडथळा निर्माण करू नका . पनवेल मधील दारूची दुकाने व हॉटेल बंद करण्याचा प्रस्ताव यापुढे सभागृहात आला नाही पाहिजे . हे तुमचे पाऊल मागे घ्यावेच लागेल . तुम्ही दुर्बुद्धी असल्यासारखे का वागता ,समाजहिताचे निर्णय घेऊन आपण पनवेलकरांच्या मनात  स्वतःची प्रतिमा भली मोठी उभी केलीय . त्याला छेद देण्याचा प्रयन्त आपला चाललाय हे मी जाणतो . तुमच्या चेहर्यावर काळे फासेन ,तुमच्या चारियावर डाग लावीन . आम्ही तशी फिल्डिंग मंत्रालयातून लाऊनच हा पत्र प्रपंच केला आहे . उपायुक्त बावनकुळे बाई आणि लेंगरेकर यांची तोंडे गप्प करा . अन्यथा पहिली गोळी तुम्हाला नंतर त्यांना जीवप्यारा असेल तर येथून पळून जा अशी पत्राद्वारे धमकी देऊन सरते शेवटी असे लिहले आहे कि नवी मुंबईत जसे तुकाराम मुंडेंचे झाले तसेच तुमचे होईल ,हे ध्यानात  ठेवा . या धमकीला मस्करीत घेऊ नका . तू माघार घेतली नाहीस तर तुझा जीव घ्यायची आमची तयारी आहे . जिवप्यारा असेल तर आमच्या आदेशाने वागा अन्यथा तुमचाही मुंडे करून अशी धमकी दिल्याने पालिकेत खळबळ माजली आहे .

कोट

मला आलेले जीवे मारण्याच्या धमकीच्या पत्राला मी फारसी किंमत देत नाही . प्रशासकीय कामकाज करत असताना अश्या धमक्या या येत असतात . त्याला किती महत्व द्यायचे हे आपल्यावर आहे . अश्या धमक्यांना मी भीक घालत नसून मी माझी प्रशासकीय कामे अशीच पुढे चालू ठेवीन . 

डा सुधाकर शिंदे

आयुक्त पनवेल महानगर पालिका
के नाम से लगा दो

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email