पनवेल तालुक्यातील शासकीय कार्यालयात सॅनिटरी नॅपकिनसाठी वेन्डींग मशीन बसवावी,आपला आधार फाउंडेशन

( म विजय )

पनवेल महानगर पालिकेत आज मोठ्या प्रमाणात महिला वर्ग काम करीत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यातच मोठी अडचण हि मासिक पाळीची आहे. काम करीत असताना कोणत्याही प्रसंगी त्यांना लगेच सॅनिटरी नॅपकीन मिळावी व त्यांची अडचण होऊ नये म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाने पावले उचलून सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या महिलांसाठी योग्य पावले उचलली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने शाळा व महाविद्यालये, तसेच सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिनसाठी वेन्डींग मशीन बसविण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. या आदेशानुसारच  पनवेल तालुक्यातील शासकीय कार्यालयात  सॅनिटरी नॅपकिनसाठी वेन्डींग मशीन लवकरात लवकर बसवावी जेणेकरून कोणत्याही महिला ची गैरसोय होऊ नये , व तसेच कामानिमित्त देखील शासकीय कार्यालयात  येणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे त्यांना भविष्यात अडचण भासू नये यासाठी पनवेलमधील शासकीय कार्यालयात व पनवेल तालुक्यातील विविध पोलीस ठाणे या ठिकाणी  अनेक विभागात महिला व मुली कर्तव्य करीत असल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने आपला आधार फाउंडेशन संस्थेतर्फे सॅनिटरी नॅपकिनसाठी वेन्डींग मशीन बसवावी अशी मागणी पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, महापौर डॉ. कविता चौतमल, उपमहापौर चारुशीला घरत,पनवेल तहसील कार्यालय, परिमंडळ २ चे उपायुक्त राजेंद्र माने व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना आपला आधार फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी भेटून याबाबत निवेदन दिले तसेच लवकरच नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी प्रत्यक्ष भेटून याबाबत प्रत्येक पोलीस ठाण्यात सुविधा पुरविण्याबाबत मागणी करणार आहेत.  यावेळी रुपालीताई शिंदे, शशी देसाई, नंदिनी गुप्ता, शबनुर शेख, वैजयंती बिश्वास, वकील हेमा गोतमारे, रागिनी तांबोळी आदी महिला उपस्थित होत्या.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email