पद्मावत चित्रपटाच्या प्रयोगा दरम्यान थिएटरच्या आवारात दोन पेट्रोल बॉंम्ब फेकले

श्रीराम कांदु 

कल्याण – पद्मावत चित्रपटाचा प्रयोग रोखण्यासाठी पेट्रोल बॉंम्ब फेकल्याची घटना नुकतीच कल्याण शहरात घडली आहे.थिएटरच्या आवारात पेट्रोल बॉंम्ब फेकल्याच्या या वृताने शहरात खळबळ माजली होती.

कल्याण येथील भानुसागर मल्टीस्क्रीन थिएटरच्या आवारात शनिवारी संध्याकाळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तिंनी दोन पेट्रोल बॉंम्ब फेकले . संध्याकाळी सुरु असलेल्या ६ ते ९ चा प्रयोग चालु होता सदर प्रयोग सूटण्याच्या सुमारे १० मिनिटे अगोदर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तिंनी दोन पेट्रोल बॉंम्ब फेकले व तेथून पोबारा केला.याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email