पदवीधर मतदार नोंदणी आता सुट्टीच्या दिवशी देखील होणार

( श्रीराम कांदु )

ठाणे दि ३: पदवीधर मतदारांकडून मतदार नोंदणीसाठी मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार ४ व रविवार ५ नोव्हेंबर या सुट्ट्यांच्या दिवशी देखील मतदार नोंदणी सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

त्याप्रमाणे सर्व मतदार संघातील मतदार कार्यालये, सर्व तहसीलदार कार्यालये या दोन्ही सुट्ट्यांच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ या वेळेत सुरु असतील असे कळविण्यात आले आहे. ६ नोव्हेंबर हा मतदार याद्यांच्या पुनरिक्षण दावे व हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे. तरी पदाविधारणी फॉर्म १८ नव्याने भरून सदर करावा

कोण नोंदणी करू शकतो

जी व्यक्ती भारताची नागरिक आहे

त्या मतदार संघातील रहिवासी आहे

१ नोव्हेंबर २०१७ पूर्वी किमान ३ वर्षे विद्यापीठाची पदवीधर किंवा समतुल्य अर्हता असावी

विद्यापीठाचे प्रमाणपत्र हे रहिवास पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email