पत्रकार सुधीर शुक्ला यांच्यावर प्रवाशांच्या ग्रुपने केला हल्ला


मुंबई- इंडिया टीवीचे वरिष्ठ पत्रकार सुधीर शुक्ला यांच्यावर सकाळी मीरारोड स्टेशन ते अंधेरी की या लोकल ट्रेन प्रवासादरम्यान लोकल ट्रेन मधील गुंडांच्या एका ग्रुपने हल्ला करुन त्यांना जखमी केले.यात त्यांचा डोक्यलाही दुखापत झाली आहे. सुधीर शुक्ला मीरा रोड येथून ज्या डब्यात चढत होते त्यातील उभ्या राहिलेल्या प्रवाशांच्या ग्रुपने त्यांना डब्यात चढू दिले नाही.त्यांना कार्यालयात जायचे असल्याने ते कसेबसे डब्यात शिरले.नंतर त्यांच्यात वाद झाला आणि त्या ग्रुपने त्यांना मारहाण केली.शुक्ला यांनी त्यांचा फोटो काढायचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन धरून त्याना अडवण्यात आले.अंधेरीच्या जीआरपी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.मुंबई क्राइम रिपोर्टर्स एसोसिएशनचे प्रतिनिधि मंडळ याप्रकरणी रेलवे पोलिस आयुक्त याना भेटून या घटनेचा निषेध करत कार्यवाईची मागणी करणार आहे.दरम्यान गृह राज्य मंत्री रणजीत पाटिल यांनी पत्रकार सुधीर शुक्ला यांच्याशी संपर्क साधुन त्यांची विचारपूस केली.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी दोषी व्यक्तीवर करवाई होईल असे आश्वासन मेसेज करुन दिले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email