पत्रकार फाउंडेशन” (रजि.)चा शुभारंभ कार्यक्रम, पत्रकारणाच्या पाल्यांचा होणार गुणगौरव
बालकृष्ण मोरे
पत्रकारांना छत्र्या वाटप तर पत्रकारांच्या पाल्याना वह्या, गणवेश वाटप
कल्याण / “पत्रकार फाउंडेशन” या नुकत्याच रजिस्टर झालेल्या पत्रकार संघटनेच्या शुभारंभा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन दि. २० जून रोजी संध्याकाळी ४ ते ८ वाजे दरम्यान करण्यात आले आहे.
यात गुरुवारी संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान पत्रकारांन साठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.दिनेश गुप्ता हे या योग्य शिबीरात पत्रकारांना योगा बाबत मार्गदर्शन करणार आहेत.
संध्याकाळी ६ ते ८ वाजे पर्यत पत्रकारान साठी पावसाळी छत्री वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.या बरोबरच पत्रकारांच्या पाल्यानं साठी गणवेश वाटप,वह्या वाटप तसेच १०वी व १२वी मध्ये जी पत्रकारांची मुले चांगल्या मार्कांने पास झाली आहेत त्यांच्या गुणगौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे, आतरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, युवा नेते वैभव गणपत गायकवाड आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.