पत्रकार परिषदेत तोगडिया यांचा आरोप : पोलीस माझा एन्काउंटर करणार होते

सोमवारी सकाळपासून बेपत्ता झालेले  तोगडिया संध्याकाळी बेशुद्धावस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं. रक्तदाब कमी झाल्यानं ते बेशुद्ध पडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, पण ते सुरक्षारक्षक न घेता का आणि कुठे  जात होते, हे स्पष्ट झालं नव्हतं. त्यांच्या बाबतीत नेमकं काय झालं असेल, याबद्दल चर्चेच वातावरण होतं. त्याबद्दलची माहिती तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा जुनी प्रकरणं काढून आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

पोलिसांनी आपला एन्काउंटर करण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी  केला आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेनं आपल्याविरुद्ध षड्यंत्र रचल्याचं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. हिंदू ऐक्यासाठी काम करत असल्याने माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे असही ते म्हणाले.
राजस्थान आणि गुजरातचे पोलीस मला अटक करण्यासाठी येत आहेत, अशी माहिती एका व्यक्तीने खोलीत शिरून दिली. मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण, पुढच्या काही मिनिटांतच ही बातमी खरी असल्याचं फोनवरून कळलं आणि मी तडक बाहेर पडलो. मी एन्काउंटरला किंवा मरणाला भीत नाही. पण, काही अघटित घडलं तर देशभरात वाईट परिस्थिती निर्माण होईल, या काळजीने मी निघालो होतो. जयपूरला जाऊन न्यायालयापुढे हजर होण्यासाठी जात असताना मला अचानक चक्कर आली आणि रात्री जेव्हा शुद्धीवर आलो, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो, असा घटनाक्रम तोगडिया यांनी सांगितला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email