पत्रकाराच्या आई आणि मुलीचं अपहरण करून निर्घृण हत्या ; हत्येचं कारण अस्पष्ट

नागपूर – पुन्हा एकदा एका गंभीर गुन्हयाने नागपूर येथे भीतीचे वातावरण पसरले आहे. उमरेड रोड परिसरात आजी आणि नातीचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. उषा कांबळे आणि राशी कांबळे असं या मृत आजी आणि नातीचं नाव आहे. त्या पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई आणि नात ही त्यांची मुलगी आहे. काल रात्रीपासून त्या दोघीही बेपत्ता होत्या. दिघोरी नाक्याजवळ या दोघींचा मृतदेह सापडला.
नागपूर टुडे या वेबसाईटचे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई आणि दीड वर्षांची मुलगी कालपासून बेपत्ता होती. त्यामुळे सापडलेले मृतदेह त्यांचेच असल्याचं स्पष्ट झाले आहे.या आजी आणि नातीच्या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नागपूरच्या उमरेड रोज परिसरात संजुबा हायस्कूल जवळ त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे. या गंभीर आणि धक्कादायक प्रकारामुळे नागपूर परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email