पत्नीवर गोळ्या झाडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या
कोल्हापूर – येथील पत्नीचा खून करून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. बबनराव बोबडे (वय ६५, रा. देवकर पाणंद) असे त्या निवृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर त्यांच्या पत्नीचे नाव रेखा आहे. मात्र त्यांनी हे कृत्य का केले याचा उलगडा होऊ शकला नाही.
बबनराव बोबडे हे मुंबईमध्ये पोलीस खात्यात अधिकारी होते .आठ वर्षापूर्वी ते मुंबई येथून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना दोन मुले असून एक मुलगा संतोष हा एअर फोर्समध्ये तर दुसरा सचिन हा हॉटेलमध्ये कुक आहे.
निवृत्तीनंतर बोबडे हे पत्नी रेखा यांच्यासह देवकर पाणंद येथे मनीषा घोटगे यांच्या सदनिकेमध्ये गेल्या एक वर्षापासून भाड्याने राहात होते. याच भागात त्यांचे जवळचे नातेवाईक महेश सुरेश अडसुळे राहतात.
Please follow and like us: