पत्नीला फिनेल पाजत जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न – डोंबिवलीतील घटना

(श्रीराम कांदु)

कल्याण दि.२५ – एका पतीने आपल्या पत्नीलाच फिनेल पाजत तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील क्रांती नगर झोपडपट्टी मध्ये घडली आहे. या प्रकरणी सदर पिडीत महिलेने डोंबिवली पोलीस स्थानकात देण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी पती केदारनाथ कुराडे ,सासू पार्वतीबाई कुराडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

डोंबिवली पूर्व टंडन रोड येथील क्रांती नगर झोपडपट्टी सदर महिला आपल्या कुटुंबासह राहते सोमवारी दुपारच्या सुमारास या महिलेच्या पतीने तिला जबरदस्तीने फिनेल पाजले सुदैवाने सदर महिला बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सदर महिलेने डोंबिवली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी पती केदारनाथ कुराडे ,सासू पार्वतीबाई कुराडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email