पती-पत्नीत वादात मध्यस्थी करणाऱ्या सासूचे बोट कुऱ्हाडीने कापले ; आरोपीस अटक

नगर – पत्नीला सासरी नांदायला येण्याच्या कारणावरून पती-पत्नीत सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या सासूच्या डाव्या हातावर जावयाने हातातील कुऱ्हाडीने वार केला. यात सासूच्या मधल्या बोटाची कांडीच तुटली. कारेगाव शिवारातील बरड वस्तीवर ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की बाबासाहेब भास्कर थोरात (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) याची पत्नी वैशाली कारेगाव येथे माहेरी होती. तिला आणण्यासाठी तो सासुरवाडीला गेला. यावेळी नांदण्याच्या कारणावरून पती-पत्नीत वाद झाले. पती हा पात्निला मारहाण करत असताना तिची आई जिजाबाई तुकाराम औटी (वय ५०) या वाद सोडविण्यासाठी मध्ये पडल्या. यावेळी त्याच्या हातात कुऱ्हाड होती. त्याने कुऱ्हाडीचा घाव जिजाबाई यांच्या डाव्या हातावर घातल्याने त्यात त्यांच्या हाताचे मधल्या बोटाची कांडी तुटली. घटनेनंतर जिजाबाई यांना साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांनी दिलेल्या जवाबावरून तालुका पोलिसांनी गु.र.नं. २१/१८, भादंवि कलम ४५२, ३२६, ३२३, ५०२, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार ससाणे करीत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email