पती पत्नीचा वाद मिटवण्यास गेलेल्या इसमालाच बेदम मारहाण – डोंबिवलीतील घटना
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०४ – भावचे आणि त्याच्या पत्नीचे झालेले भांडण मिटवण्यास आलेल्या एका इसमाला बेदम मारहाण करण्यात आल्यःची घटन कल्याण पश्चिम बैलबाजार परिसरात घडली आहे.
नवी मुंबई कोपरखैरणे येथे राहणारे एजाज कुरेशी हे आपला भाऊ व त्याच्या पत्नी मध्ये झालेले भांडण मिटवण्यासाठी काल दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात आला होता. यावेळी त्यांची बोलनी सुरु असतांना झालेल्या वादातून नऊ जणांनी एजाज कुरेशी व त्याच्या सोबत असणार्याना शिवीगाळ बेदम मारहाण केली. या प्रकरणी कुरेशी यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी फिरोज कुरेशी ,जुबेर कुरेशी ,अल्ता कुरेशी ,उबेद कुरेशी ,फिरोज कुरेशी, अहमद कुरेशी व त्याच्या 3 भावा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.