पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार
2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याशी संबंधित विविध उपक्रमांची चर्चा करणार
नवी दिल्ली दि.18 – प्रथमच पंतप्रधान देशभरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार असून, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याशी संबंधित विविध उपक्रमांबाबत चर्चा करणार आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार 20 जून रोजी सकाळी साडे नऊ वाजता देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. कृषी विज्ञान केंद्राची सामान्य सेवा केंद्रे, दूरदर्शन, डीडी किसान आणि आकाशवाणीवरुन हा कार्यक्रम थेट प्रसारीत केला जाईल. नरेंद्र मोदी ॲपच्या माध्यमातून जनतेला पंतप्रधानांशी संवाद साधता येईल.
Please follow and like us: