पंतप्रधान आवास योजने  बद्दल सांगुन नागरिकांना फसवून त्यांच सोनं चोरणाऱ्या अट्टल चोराला अटक

(म.विजय)

 कळवा –  तुकाराम लाला अडसूळ वय 41वर्ष राहणार घणसोली नवी मुंबई हा गरीब लोकांना हेरून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर मिळवून देतो असे सांगुन त्यांची संपूर्ण माहीती काढत असे त्यानंतर त्यांना फॉर्म भरण्या साठी शासकीय कार्यालयात बोलवत असे घरात नवरा बायको असतील तर दोघही घरातुन बाहेर गेल्यावर व सांगितलेल्या  कार्यालयात पोहचल्याची खात्री करून झाल्यावर , तुकाराम अडसूळ त्यांच्या घराच्या जवळ जाऊन  घराचे टाळ तोडून सोन्याचे दागिने घेउन पसार होत असे , घरात जर लहान मुल असतील तर त्यांना झेरॉक्स काढण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवुन घरात चोरी करत असे , जर घरात जास्त लोक असतील तर तो चोरी करण्याचा प्लान सोडुन देत असे , अशा प्रकारे त्याने आतापर्यंत कळवा , मुंब्रा , शीळडायघर , कापूरबावडी , कासारवाडवली , भिवंडी , नारपोली , डोंबिवली , मानपाडा , कोळसेवाडी , उल्हासनगर , अंबरनाथ बदलापूर , वालीव पोलीस ठाणे , तसेच नवी मुंबई आयुक्तालयातील नेरुळ , कळंबोली , सीबीडी , बेलापुर , तुर्भे , एनआरआय सागरी , कोपरखैरणे असे एकूण 19 पोलीस स्टेशन हद्दीत 37 गुन्हे केले आहेत ,  अशी माहीती पोलीस सह आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली  , कळवा पोलीसांनी त्याला शिताफीने अटक करून त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने हे सोन्याचे दागीने ज्वेलर्स नरेश उर्फ नारायणसिंह धनसिंह खरवडराहणार नवी मुंबई  2) रमेश उर्फ रहमेतसिंह भोरसिंह खरवड राहणार नवी मुंबई  3) करणसिंह गंगासिंह सिसोदिया राहणार अंधेरी पूर्व यांना विक्री केल्याचे सांगीतले ह्या सगळ्यांना  अटक करून त्यांच्या कडुन  एकूण 2000 ग्रँम ( 2 किलो ) वजनाचे दागीने , सोन्याचे लगडी तसेच सोने वितळविण्याचि मशिन व साहित्य असे 47,20,600 /- रुपये किमती मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे , हे मिळालेलं सोन पोलीसांनी कोर्टाच्या आदेशाने उपस्थित  नागरिकांना  परत केल आहे .हा कौशल्य पूर्ण तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे व त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर , पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे व त्यांच्या पथकाने केला आहे .जमलेल्या नागरिकांनी आपलं चोरीला गेलेल सोन परत मिळवुन दिल्या बद्दल पोलिसांचे आभार मानले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email