पंतप्रधानांनी केले नागरी विकास प्रकल्पाचे उद्घाटन
नवी दिल्ली, दि.२४ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यातील विविध ठिकाणी नागरी विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, शहरी पेयजल पुरवठा योजना, शहरी घनकचरा व्यवस्थापन, शहरी स्वच्छता, शहरी वाहतूक व शहरी लँडस्केप प्रकल्प या योजनांचा समावेश आहे.
इंदोर येथे एका कार्यक्रमात त्यांनी स्वच्छ सर्वेक्षण -2018 पुरस्कार ही वितरीत केले आणि स्वच्छ सर्वेक्षण -2018 च्या निकालाच्या डॅशबोर्डची सुरुवात केली.
या प्रसंगी एका मोठ्या समारंभास संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, ‘स्वच्छ भारत’ हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते आणि आता तो 125 कोटी भारतीयांचे संकल्प बनला असल्याचे ही ते म्हणाले. संपूर्ण देश इंदोर शहराकडून स्वच्छतेची प्रेरणा घेऊ शकेल, ज्याला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी झारखंड, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या देशाच्या तीन शहरांचे देखील उत्कृष्ठ स्वच्छतेसाठी कौतुक केले.
त्यांनी देशातील विविध राज्यांनी स्वच्छतेत केलेल्या प्रगती बद्दल माहिती सांगितली. पुढील वर्षी आपल्या 150 व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींचे हे स्वप्न सत्यात उतरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतामध्ये शहरी पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकार कशाप्रकारे काम करत आहे, या संबंधी पंतप्रधान बोलत होते. स्वच्छ भारत अभियाना व्यतिरिक्त, त्यांनी प्रधान मंत्री आवास योजना (शहरी), स्मार्ट सिटी मिशन, एएमआरयूटी, आणि दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय शहरी जीविका मिशनचा उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी नूतन रायपूरमध्ये भारताच्या पहिल्या स्मार्ट सिटीमध्ये एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटरचे उद्घाटन त्यांनी केले होते. मध्यप्रदेशातील सात शहरांमध्येही अशीच कार्यवाही सुरू आहे, असेही ते म्हणाले.
मध्यप्रदेशमधील विविध नागरी विकास उपक्रमात प्रगती करण्याच्या प्रक्रियेबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आज उद्घाटन गृहनिर्माण प्रकल्प माध्यमातून, एक लाख पेक्षा अधिक बेघर लोकांना मध्य प्रदेशात स्वत:चे घर मिळाले आहे.
भारत सरकार वर्ष 2022 पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून काम करत आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांत जवळजवळ 1.15 कोटी घरे बांधण्यात आली आहेत आणि 2 कोटी पेक्षा अधिक घरे निर्मिती प्रक्रियेत आहेत जे वर्ष 2022 पर्यंत पूर्ण करण्याच्या लक्ष्यांतर्गत आहेत.ते पुढे म्हणाले की, प्रधान मंत्री गृह योजनाही रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरणाचे साधन बनत आहे.
पंतप्रधानांनी विकासाच्या इतर क्षेत्रातील प्रगती विषयी माहिती सांगितले.